बेळगाव : बेळगाव तालुक्यातील खनगाव के.एच. गावाजवळ बेळगाव-गोकाक बसला झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुळेभावी गावातील दुचाकीस्वार विठ्ठल दत्ता लोकरे (२९) याचा मृत्यू झाला. दुचाकीला धडकलेली बस काही अंतरावर जाऊन शेतात पलटी झाली. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
बस बेळगावहून गोकाककडे जात होती. समोरून येणाऱ्या एका दुचाकीने बसला धडक दिली. बसच्या धडकेने दुचाकीस्वार शेतात जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.