बेळगाव : महांतेश नगर भागात पावसाळ्यात रस्त्यांवर तुंबणारे पाणी आणि पिण्याच्या समस्यांशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी अलीकडेच सर्वे केला होता. यानंतर या भागातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज आमदारांच्या अनुपस्थितीत आमदारांचा मुलगा अमन सेठ यांनी स्थानिक नगरसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांच्या पथकाच्या उपस्थितीत खुसरो नगर येथील विकासकामांचा प्रारंभ केला. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांसाठी तातडीने उपाययोजना आखून समस्यांचे निराकरण करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अमन सेठ यांनी व्यक्त केली.