बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेच्या वतीने संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बेळगाव येथील केएलई सेन्टेनरी हॉलमध्ये 9 आणि 10 जून रोजी चार्टर्ड अकाउंटंट्सची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा यांनी दिली.
बेळगावातील आयसीएआय हॉलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चार्टर्ड अकाउंटंट्स नॅशनल कॉन्फरन्समध्ये गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीसह इतर शाखेतील चार्टर्ड अकाउंटंट आणि सीए विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आयसीएआय अध्यक्ष रंजिता कुमार अग्रवाल राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. व्हीआरएल ग्रुप ऑफ कंपनीजच्या सीएमडी डॉ. विजया संकेश्वर, केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकार कोरे, उद्योजक संजय घोडावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या परिषदेत या क्षेत्रासंदर्भात मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि अकाउंटन्सीमधील उदयोन्मुख ट्रेंड आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करण्यात येईल. व्यवसायातील तज्ज्ञ त्यांचे अनुभव सांगतील. चार्टर्ड अकाउंटंट्सच्या राष्ट्रीय परिषदेत सामाजिक उपक्रमांचे नियोजन देखील करण्यात आले असून वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे सदस्य आणि विद्यार्थी यांच्यावतीने नेत्रदान आणि अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
यावेळी सीए एम.एस. तीगडी, नितीन निंबाळकर, यासीन देवलापूर, संजीव देशपांडे आदींचा सहभाग होता.
Belgaum Varta Belgaum Varta