बेळगाव : मंगाई नगर वडगाव येथे तलावात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. उदय गुरुराज सेठ (39) मुळगाव उत्तर कन्नड जिल्हा सध्या राहणार वडगाव मांगाई नगर असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, उदय हा तलावाकडे फिरावयास गेला असता त्याचा पाय घसरला होता. तलावात पडला त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती शहापूर पोलीसांना समजताच तात्काळ यांनी घटनास्थळी धाव घेतली व अग्निशामक दलाला पचारण केले. सायंकाळी उशिरा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले असून शहापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.