Thursday , March 5 2026
Breaking News

वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था; डागडुजी करण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : वाघवडे-मच्छे रस्त्याची झालेली दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाली असून रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेकवेळा लहानसहान अपघात घडत आहेत. वेळोवेळी निवेदन देऊन देखील संबंधित खात्याने या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाला सुरुवात होण्याआधी या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *