बेळगाव : बेळगाव येथील शहापूर येथील होसूर हरिजन गल्ली येथे एका कुटुंबातील दोन घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घरातील पैसे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शिवराज अशोक मोदगे व शशिकांत मोदगे यांच्या घरात विवाह सोहळा असल्याने घरात ठेवण्यात आलेले पैसे, दागिन्यांसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. सदर घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे.