बेळगाव : जायंट्स या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नाना चुडासमा यांचा १७ जून हा जन्मदिन दरवर्षी जायंट्स चळवळीमध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.
यंदा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने महावीर ब्लड बँक येथे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास १५ हुन अधिक सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगाचे औचित्य साधून अध्यक्ष श्री. अविनाश पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, रक्तदान ही काळाची गरज असून त्यामुळे गरजू लोकांना फायदा होतो. नाना चुडासमा यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवित आहोत.
विनोद आंबेवाडीकर, अरुण काळे, अशोक हलगेकर, राजू बांदिवडेकर, प्रदीप चव्हाण, आनंद काटकर यांनी रक्तदान केले.
आभार प्रदर्शन सेक्रेटरी यल्लाप्पा पाटील यांनी केले. यावेळी भरत गावडे, अविनाश पाटील, अनिल चौगुले, विजय बनसुर, आनंद कुलकर्णी, मधु बेळगावकर, संजय पाटील मिल्क, प्रकाश ताजी इत्यादी हजर होते.
Belgaum Varta Belgaum Varta