बेळगाव : जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच बेळगाव येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. अशोक साठे यांचे दिनांक २० रोजी पुणे येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
एक सुस्वभावी, सहृदयी डॉक्टर तसेच कलासक्त नाट्यकर्मी अशी त्यांची ओळख होती. कडोलकर गल्ली येथील त्यांच्या दवाखान्यामधून त्यांनी बेळगावकरांची दीर्घकाळ वैद्यकीय सेवा केली होती. तसेच वाङ्मय चर्चा मंडळाच्या माध्यमातून झालेल्या अनेक नाट्य उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे बेळगावातील नाट्य विश्वातील एक कुशल मार्गदर्शक हरपला असल्याची प्रतिक्रिया नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta