Monday , December 23 2024
Breaking News

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सीमाभागातील नागरिकांनी उपयोग करून घ्यावा; मंगेश चिवटे

Spread the love

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला भेट

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमाभागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे. बेळगाव आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्रलंबित होते या अर्जाविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी श्री. मंगेश चिवटे आज बेळगावला आले होते.

डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या काही नागरिकांना ते प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेऊन हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांची चर्चा करून जागीच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील आरोग्य समन्वयकासमवेत चर्चा करून उपस्थितातील श्रीकृष्ण पन्हाळकर
(लिव्हर ट्रान्सप्लांट रुग्ण) (2,00,000/-), श्री. प्रशांत हांडे (किडनी ट्रान्सप्लांट) (2,00,000/-), श्री. अभिजीत सावंत
(हार्ट ट्रान्सप्लांट) (2,00,000/-), श्री. सिद्धाप्पा रवळूचे
(ओपन हार्ट सर्जरी) (1,00,000/-) यांच्या अर्जावर ताबडतोब निर्णय घेऊन त्यांना अर्थसहाय्य मंजूर केले. इतर अर्जदारांच्या संदर्भातील योग्य व आवश्यक माहिती कक्षाला ताबडतोब कळवण्याची विनंती केली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, आरोग्य समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, अनिल अंबरोळे, श्री. राजाराम मजुकर आणि अर्जदारांचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी श्री. मंगेशजी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भात माहिती देऊन सीमाभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. मदतीसंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून आणि जास्तीत जास्त नागरिकांना याची माहिती देऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले. याबरोबरच महाराष्ट्र सरकार महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ ही सर्वांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या या बैठकीच्या वेळी डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे श्रीमान शंकर प्रसन्नावर (PRO, KLE) यांनी सविस्तर माहिती देऊन आपले हॉस्पिटल गरजूंना निश्चितपणे मदत करेल असे आश्वासन दिले. श्री. अनिल अंबरोळे व राजाराम मजुकर यांनी पेशंटच्या वतीने श्री. मंगेश चिवटे यांचा सन्मान केला. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल असे श्री. चिवटे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त सीमा प्रदेशातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्राची प्रत श्री. चिवटे यांच्याकडे देऊन यासंदर्भात आवश्यक ते सहकार्य करण्याचे विनंती केली.

About Belgaum Varta

Check Also

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love  बेळगाव : 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *