बेळगाव : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संजीवीनी फौंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आदर्श नगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटेरिअन अविनाश पोतदार उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अँटोनियो कार्व्हलो
जेजे हॉस्पिटल मुंबई येथून एमबीबीएस एमडी (मानसोपचार) या दोन्ही वैद्यकीय पदवी संपादित केल्यानंतर मुंबईच्या होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून काम नंतर १८ वर्षे होनावर येथे खाजगी प्रॅक्टिस. बिम्समध्ये २ वर्षे आणि केएलईमध्ये गेल्या दहा वर्षांपासून प्राध्यापक (मानसोपचार) आणि येळ्ळूर केएलईमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.एस.एस. चाटे
प्राध्यापक आणि एचओडी जे एन मेडिकल कॉलेज, बेळगाव.
मूळचे बैलहोंगल येथील दावणगेरी येथील जेजेएम वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी संपादित केल्यानंतर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी (मानोसोपचार)चे शिक्षण पूर्ण केले. २००४ पासून मानसोपचार तज्ञ म्हणून सेवेस सुरुवात सदाशिवनगर येथे कीर्ती माइंड क्लिनिकच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व मानसोपचार रुग्णांवर उपचार करत आहेत.
डॉ. विजयालक्ष्मी पुरद
मूळच्या गदगच्या रहिवासी असलेल्या डॉ. विजयालक्ष्मी यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, बेळगाव येथून एमबीबीएस ही पदवी घेऊन एमव्हीजे मेडिकल कॉलेज, बेंगळुरू येथे एमडी (मानसोपचार) पूर्ण केले.
गदग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील सेवा बजावली आहे.
सध्या बिम्समध्ये कार्यरत आहेत. विविध मानसिक विकारांसाठी मानसोपचार आणि समुपदेशन प्रदान करत असतात.