Thursday , December 11 2025
Breaking News

यंग बेलगाम फाऊंडेशनची कार्यतत्परता; रस्त्यावर पडलेली खडी हटवली

Spread the love

 

बेळगाव : खडी वाहून नेणाऱ्या ट्रकमधील खडी रस्त्यावर पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी यंग बेळगाम फाउंडेशनतर्फे खडी हटवण्यात आली.
काल बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी जवळील अशोक आयर्न वर्क्स समोर एका दुचाकीचा अपघात झाला असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. असे अपघात पुन्हा होऊ नयेत, यासाठी यंग बेलगाम फाउंडेशनच्या वतीने खडी बाजूला सारून स्वच्छ करण्यात आला.
शहरात ओव्हरलोड ट्रकच्यामधून खडी रस्त्यावर पडत जात असल्याने असे अपघात घडत असून, वाहतूक पोलिस विभागाने यावर कारवाई करण्याची गरज आहे. ओव्हरलोड ट्रक आढळून आल्यास त्यांना दंड करावा आणि अपघात टाळण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी यंग बेलगाम फाउंडेशनचे प्रमुख ॲलन मोरे यांनी केली. यावेळी मृणाल कलमणी, संदीप सोमनट्टी, आदित्य गावडे, नितीन कोठारी, लकी सोलंकी, ध्रुव हंजी आदींचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

समितीच्या जीवावर पदे भूषविलेले आजी-माजी लोकप्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून अलिप्त!

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *