बेळगाव : जायन्टस ग्रुप ऑफ बेलगाम परिवारतर्फे चार्टर्ड अकाउंटंट दिनाच्या निमित्त टिळकवाडी बेळगांव येथील प्रसिद्ध अकाउंटंट श्री. सुनील महादेव भिडे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य सुनील भिडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध चार्टड अकाउंटंट सुनील भिडे हे आपल्या चिरंजीव आदित्य भिडे यांना चार्टड अकाउंटंट बनवलं आहे तसेच बेळगावतील इतर तरुणांना अकाउटंट म्हणून तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बेळगावतील उद्योगपती तसेच नामवंत व्यवसायीकांचे चार्टर अकाउंटंट म्हणून आपली सेवा बजावत असतात. चार्टर अकाउंटंट दिनाचे औचित्य साधून जायन्टस बेलगाम परिवारतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी फेडरेशन अध्यक्ष राजू माळवदे, फेडरेशन डायरेक्टर प्रवीण त्रिवेदी, उपाध्यक्ष सचिन केळवेकर उपस्थित होते.