अंकली : इंगळीतील बहुद्देशीय प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी सुनील पाटोळे तर उपाध्यक्षपदी बिबाताई शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजाराम माने यांनी प्रास्तविक केले. संचालक मंडळ आणि संस्थेतर्फे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटोळे यांनी सर्वांच्या सहकायनि संघासह सभासदांच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. अजित चिगरे यांनी आगामी काळात संस्थेतर्फे रुग्णवाहिकेची सोय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आप्पासाहेब सौंदलगे, डॉ. विनायक मुतालिक, बापुसाहेब रामदुर्ग यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक मारुती पवार, हुवण्णा चौगुले, बसाप्पा कांबळे, सुभाष घोसरवाडे, गणपती धनवडे, आप्पासाहेब मिर्जे, आप्पासाहेब जत्राटे, सुभाष खोत, बाबासाहेब जुगळे, बाबासाहेब धाबडे, तात्यासाहेब चौगला, सदाशिव कुडचे, शशिकांत धनवडे, सुभाष उन्हाळे, आण्णासाहेब डिगरजे, वाल्मिकी माने, रमेश मुरचिट्टे आदी उपस्थित होते. सचिव महांतेश सुंठे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta