बेळगाव : पावसाळा सुरू झाला असून संसर्गजन्य आजार वाढले आहेत. ताप आल्यावर लोकांनी दुर्लक्ष करू नये, शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे जिल्हा आरोग्य महेश कोणी यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी सांगितले की, जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा डेंग्यूचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. त्यामुळे जनतेने काळजी घ्यावी, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार वाढत आहेत. नागरिकांनी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, ताप आल्यावर शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करू नये, डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.