बेळगाव : गदग येथे झालेल्या दुसऱ्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरची विद्यार्थीनी कुमारी आदिती अवधूत लोहार हिचा केटा आणि फाईट या कराटे प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला. तिचे मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. या तिच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी एसडीएमसीसदस्य श्री. मारुती यळगुकर यांनी तिला वही आणि पेन देऊन तिचे अभिनंदन केले. यावेळी एसडीएमसी सदस्य श्री. मूर्तीकुमार माने, श्री. जोतिबा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. आर. निलजकर तसेच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta