बेळगाव : एस. के. ई. सोसायटीची व्ही. एम. शानभाग मराठी प्राथमिक शाळा भाग्यनगर, बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मंगळवार दिनांक ९/७/२०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना आणि अभंगाने केली.
युवा समिती सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी मराठी माध्यमातूनही फार मोठे यश गाठता येते, मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास मातृभाषेतून होतो, असे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले.
आशिष कोचेरी यांनी युवा समितीच्या उपक्रमाची माहिती दिली आणि पालकांनी आपल्या पाल्यांसाठी मराठी माध्यम निवडले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, कमलाकांत कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, मुख्याध्यापक पी. एस. खनगावकर शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. सी. पाटील तर आभार प्रदर्शन जे. के. कदम यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta