बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी १ला क्रॉस, शास्त्रीनगर येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते.
वृक्षारोपण समारंभासाठी ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील आदरणीय सदस्य नारायणराव चौगुले, संजीवनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ.सविता देगीनाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मदन बामणे यांच्यासह कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या उपस्थितांना संबोधित करताना, मुख्य कार्यकारी अधिकारी मदन बामणे यांनी शहरी भागात वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले, विशेषत: मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामामुळे अनेक झाडे तोडली जात आहेत हा समतोल भरून काढण्यासाठी फाऊंडेशनने यावर्षी शहरी भागात वृक्षारोपण केल्याचे सांगितले.
या मोहिमेदरम्यान विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली असून, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. पर्यावरण जागरूकता वाढवणे आणि हिरवेगार, आरोग्यदायी वातावरणात निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.
संजीवनी फौंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनाळ यांनी स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कार्यात सतत सहभागी राहु असे सांगितले.
यावेळी फकिरा चौगुले, संजीव पाटील, सुदीप चौगुले, मेघा भातकांडे, सुधाकर चौगुले, पद्मा औषेकर, पुष्पा हिरेमठ, प्रसाद जाधव, अमित धोंगडी, सविता हुविन, दिव्या कुलकर्णी, राज सावगावकर, महेश चौगुले, प्रदीप गट्टी व इतर उपस्थित होते.