बेळगाव : नीट परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून फरारी असलेल्या एकाला बेळगाव मार्केट पोलिसांनी अटक केली.
यासंदर्भात मार्केट पोलीस स्थानकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी रोहन जगदीश यांनी माहिती दिली की, मूळच्या हैदराबादच्या अरविंद आलियास अरुण कुमार नामक व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १२ लाख रुपये रोख, १५ संगणक, ५ मोबाईल तसेच लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल जप्त केला. नोव्हेंबर २०२३ मध्ये मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार सदर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावमधील अनेक विद्यार्थी या आरोपीच्या जाळ्यात अडकले असून जवळपास १ कोटी ८ लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्याने मुंबई येथे कौन्सिलिंग करियर अकादमीची स्थापना केली होती. यापूर्वी त्याच्यावर हैद्राबाद, बेंगळुरू, भोपाळ – मध्यप्रदेश आदी ठिकाणी विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta