Thursday , March 5 2026
Breaking News

गोकाक तालुक्यात स्कूल बस उलटून ६ विद्यार्थी गंभीर

Spread the love

 

गोकाक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थी गंभीर जखमी तर अनेक जण किरकोळ जखमी झाले.
बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉसजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मरडीमठ या खासगी शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला. या घटनेत सुमारे ६ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *