कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर अर्धवट कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणही जखमी झाले नाही. कोसळलेले घर पत्रकार सुनील शंकर पाटील यांचे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्य जेवत असताना, शेजाऱ्यांनी त्यांना घराची भिंत पडल्याची खबर दिली. घराची भिंत कोसळण्यापूर्वी पाटील कुटुंबीयांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.
पीडिओ कृष्णाबाई भंडारी, ग्राम लेखापाल आरिफ मुल्ला, पंचायत अध्यक्ष सागर पाटील, पंचायत सदस्य राजू मायाण्णा, प्रेमा नरोटी आदींनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta