बेळगाव : माजी सैनिक संघटना संघटनेने आज कुमार गंधर्व सभागृहात कारगिल विजय दिवसाचे स्मरण करून भारताच्या स्वाभिमानासाठी आणि सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या निर्भीड योद्ध्यांना आदरांजली वाहिली.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दोन मिनिटे स्तब्धता पाळून आणि हुतात्म्यांना अभिवादन करून झाली. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेला अभिवादन करण्यात आले. सुरेश हांजी यांनी स्वागत केले. व्यासपीठावर डॉ. सोनाली सरनोबत, सौ. मंगला मेटगुड, जगदीश पुजेर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरली नागराज, विनयकुमार बालिकाई, मंगला मठद, सफला नगररत्न आणि वीणा विजापूर आदींची उपस्थिती होती.
या सोहळ्यात कारगिल युद्धातील वीरांचे शौर्य, बलिदान आणि अतूट समर्पण यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रेरणादायी भाषणे झाली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.