बेळगाव : कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे.
उतारवयात आधार देणारी मुले नाहीत. नातवंडे नाहीत. पतीचेही निधन झाले आहे. या आजीने कमावलेल्या पैशातून दोन भूखंड विकत घेतले आणि एका भूखंडावर घर बांधले. शांता या वृद्ध महिलेने पत्रकारांसमोर अश्रू ढाळत विनवणी केली की, तिची फसवणूक करून तिच्या नावावरील घर आणि जमीन गोविंद तलवार या व्यक्तीने त्याच्या नावावर करून घेतली आहे. तिला या वयात बेघर करणाऱ्या गोविंद तलवार याला शिक्षा झाली पाहिजे. गोविंद तलवार नावाच्या व्यक्तीने माझी फसवणूक करून माझे घर हडप करून लाखो रुपये घेतले. त्याने फसवणूक केली. घराचा कर भरला नसल्याचे सांगून आजीने पावती दिली असता, ते कागदपत्र ठेवून फसवणूक गोविंद यांनी फसवणूक केल्याचे सांगितले.
काकती ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी एकाच दिवसात लाखो रुपये किमतीचे घर आणि रिकामा भूखंड राइट ऑफ केला आहे. आता माझ्याकडे काही नाही. मी हुबळीच्या सिद्धारूढ मठात आहे. गोविंदने मला सुमारे 6 लाखांचा धनादेश दिला पण त्या अकाउंटमध्ये पैसे नाहीत. ज्याने मला रस्त्यावर आणले त्याच्याकडून मला माझे घर मिळवून द्या, अशी विनवणी करीत आजीने पत्रकारांसमोर अश्रू ढाळले.
Belgaum Varta Belgaum Varta