Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांनी पावसाने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली.
बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. आ. राजू सेठ यांनी , बेळगाव उत्तर मतदारसंघातील बसवन कुडची, बीके कंग्राळी, कॅम्प परिसरासह अनेक भागांचा दौरा करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
पावसामुळे पूर्णत: नुकसान झालेल्या घरांची यादी करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही अधिकाऱ्यांनी करावी, तसेच याप्रकरणी हलगर्जीपणा व दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी दिला.

बेळगाव शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी जनतेची काळजी घ्यावी. आमदार पुत्र अमन सेठ हे देखील मनपा अधिकाऱ्यांसोबत होते त्यांनी आमदारासोबत फिरून पावसाच्या नुकसानीची संपूर्ण माहिती आमदारांना दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *