Friday , March 6 2026
Breaking News

विजेच्या धक्क्याने सुळेभावीत दोन महिलांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : श्रावण सोमवारी एका मंदिरात साफसफाई करताना दोन महिलांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे घडली आहे. सुळेभावी गावातील वाल्मिकी मंदिराची साफसफाई सुरू असताना ही घटना घडली. मंदिराची साफसफाई आणि मंडप लावताना कलावती बिदरवाडी (३७) आणि सविता ओंटी (३६) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मारिहाळ पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाणी केली आहे

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *