बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम चिकटपट्टी निर्मिती कारखान्याला मंगळवारी रात्री 8.45 च्या दरम्यान अचानक आग लागली असून कारखान्यात अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.
कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आग पसरली. आग लागली त्यावेळी 100 हून अधिक जण आत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कारखान्याच्या लिफ्टजवळ 10 ते 15 कामगार होते. पाच जणांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अजून बरेच जण अडकले असल्याचे समजते. स्नेहम कारखान्यात प्रत्येकी तीन शिफ्टमध्ये 75 कामगार काम करत होते. आगीने थैमान घातले, तेव्हा अनेकांना बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
आग एवढी भीषण आहे की अग्निशमन दलाला बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. तरीही पोलीस, ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, या दुर्घटनेतील जखमींवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात 200 खाटांची तयारी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta