बेळगाव : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव हा सण येऊन ठेपला आहे. शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच भव्य दिव्य आणि सीमाभागात चर्चा असलेल्या गणेशोत्सवाच्या बैठकींना देखील सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात येऊ घातलेले गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीचे आयोजन आले होते.
या बैठकीत लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, यांनी गणेशोत्सव संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांना सुचना केल्या, यानंतर नगरसेवक गटनेते गिरीश धोंगडी यांनी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याकरिता आम्ही गणेशोत्सवा पूर्वी वर्क ऑर्डर ठेकेदारांना मंजूर केले आहे लवकरच कामाची सुरुवात होईल, तसेच मिरवणूक मार्गावरील महिलांसाठी टॉयलेट व्यवस्था करण्याची मागणी मानपा आयुक्तांकडे केली.
सुनील जाधव यांनी, मागील वर्षी महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या अधिकाऱ्यांचे कौतुक करून सभागृहात टाळ्यांची सलामी देऊन गौरविण्यात आले, तसेच अनेक ठिकाणी दूरसंचाराच्या वायर अडथळे निर्माण करत आहेत त्या दुरुस्ती कराव्यात, अश्या अनेक सूचना त्यांनी केल्या.
गणेशोत्सव साजरा करणाऱ्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचकडून मार्गदर्शन करण्यात आले व तसेच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विविध समस्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.
सर्व अधिकारी व महामंडळ यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी आणि मंडळांकडून काही सूचना देखील करण्यात आल्या यावर गणेशोत्सवात अडचणींवर मात काढण्यासाठी या बैठकीचा आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांचे निराकारण करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी केली. परंतु राज्य शासनाच्या नियमावलीनुसारच ही मिरवणूक पार पडेल असे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.
कुमार गंधर्व सभागृहामध्ये पोलीस आयुक्त, मनपा अधिकारी गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.