बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात शहापूर पोलिसांनी एका अटक करून त्याच्या जवळील मुद्देमाल जप्त केला आहे.
फरदीन नूर अहमद शेख रा. वझे गल्ली बोळ विष्णू गल्ली वडगाव असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळील शहापूर पोलीस स्थानक व्याप्तीतील तर हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, घराची आणि गेटच्या चाव्या जप्त केल्या आहेत.
सदर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शहापूर पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलीस आयुक्त मार्टिन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta