बेळगाव : सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठान आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने अलतगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले. मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकावी यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून कोंडुस्कर कुटुंबीय हा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत.
अलतगा येथील प्राथमिक शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमात सदर दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर, किरण हुद्दार, संजय चौगुले, अलतगा शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष बाबुराव शिवाजी जाधव, अलतगा देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta