Monday , December 15 2025
Breaking News

फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील एम आर भंडारी शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर टिळकवाडी अनगोळ, शहापूर, विभागाच्या प्राथमिक मुलां- मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत
अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला. पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने एम व्ही हेरवाडकर शाळेचा 1-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने केएलएस शाळेचा 1-0 असा पराभव केला, तर अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या फरहान मनियार याने एकमेव विजयी गोल केला. मुलींच्या गटातील पहिला उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने ओरिएंटल शाळेचा 3-0 च्या फरकाने पराभव केला. विजयी संघाच्या निधीच्या दळवीने दोन गोल तर धनश्री जमखंडीने एक गोल केला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एम व्ही हेरवाडकर शाळेने डीपी शाळेचा सडनडेथवर 1-0 असा पराभव करीत अंतिम करीत प्रवेश केला, अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने एम व्ही हेरवाडकर शाळेचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, एम आर भंडारी शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्री नाईक, स्पर्धा सचिव प्रवीण पाटील, जयश्री पाटील, सुनिता जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जयसिंग धनाजी, उमेश बेळगुदंकर, रामलिंग परीट, सिलिव्या डिलीमा, कल्लाप्पा हागिदळी, मयुरी पिंगट, संतोष दळवी यश पाटील, शिवकुमार सुतार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

रणझुंझार हायस्कूलमध्ये कै. वामनराव मोदगेकर व्याख्यानमालेचा शुभारंभ

Spread the love  निलजी : रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, निलजी येथे रणझुंझार को-ऑप. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *