बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे नुकताच इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा पालक मेळावा घेण्यात आला. शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य श्री. कल्लाप्पा देसूरकर हे अध्यक्षस्थानी होते तर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून ओलमनी हायस्कूलचे शिक्षक श्री. अजित सावंत हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. नारायण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात केले. श्री. बी. पी. काटकर याने प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला यानंतर प्रमुख पाहुण्याचे व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दहाचे वर्गशिक्षिक श्री. पी. के. झाजरी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची कर्तव्य व जबाबदारी सांगून मार्गदर्शन केले. श्रीमती एस. एम. पाटील यांनी दहावीचा निकाल वाढवण्यासाठी शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्यासाठी पालकांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते श्री. अजित सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व सांगून जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची व पालकांची कर्तव्य वेगवेगळी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. श्री. जी. आय. गुंजटकर आणि श्रीमती एस. जी. होण्णीकोळी यांनी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या समस्या यावर चर्चा केली शारीरिक शिक्षक श्री. एस. टी. तारीहाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी श्री. किल्लेकर व आनंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर सौ. लताताई पावशे यांनी पालकांना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उद्देशून मार्गदर्शन केले. श्रीमती माधुरी यळ्ळूरकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षणातील महत्त्व सांगितले. शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री. कलाप्पा देसुरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एल. पी. झंगरुचे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती शोभा चौगुले यांनी केले. या पालक मेळाव्याला सर्व कमिटीचे सदस्य व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta