

बेळगाव : अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बेळगाव येथील हिंडलगा कारागृहावर पहाटे पोलिसांनी अचानक धडक दिली. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला.
या छाप्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह २६० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
छाप्यादरम्यान पोलिसांनी तंबाखूचे पाकीट, सिगारेट, तीन चाकू, एक छोटे हीटरचे बंडल, एक इलेक्ट्रिकल स्टोव्ह आणि इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta