येळ्ळूर : श्री ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी देवीचा अभिषेक करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीत श्री चांगळेश्वरी युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पुजारी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित कार्यकर्ते पांडुरंग यशवंत पाटील, चंद्रकांत बा. पाटील, मनोहर सिद्धाप्पा पाटील, सतीश बाळकृष्ण पाटील, अनिल पुंडलिक पाटील, शंकर रघुनाथ पाटील, आत्माराम मर्याप्पा पाटील, जयपाल पुजारी, अशोक पुजारी, विजय पुजारी, सत्यजित गजानन पाटील, मधू यल्लाप्पा पाटील, राजू पुजारी, माणिक पुजारी, पृथ्वीराज पाटील, अजय पाटील, संदीप बाळकृष्ण पाटील, अनिकेत य. पाटील, समर्थ विजय पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta