Thursday , March 5 2026
Breaking News

बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक आजारी

Spread the love

 

सौंदत्ती : बोअरवेलचे पाणी पिल्याने ४१ हून अधिक जण आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथे घडली. एका महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वजण आजारी होते.

सोमवारी अचानक तब्येत बिघडल्याने ग्रामस्थांना उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. घरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमधील दूषित पाणी पिल्याने सर्व आजारी पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बोअरवेलमधून टाकीमध्ये पाणी भरून ते घरापर्यंत पुरविले जात असल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी आमदार महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी डॉ. महेश कोणी यांनी रुग्णालयाला भेट दिली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *