बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे विनायक नगर परिसरात खळबळ माजली आहे. विनायक नगरातील तिसरा क्रॉस परिसरात हा प्रकार घडला आहे. काही अज्ञातांनी हा प्रकार घडवून आणला असून यामुळे दुचाकी जळून भस्मसात झाल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशातून होत आहे. तसेच या भागात पोलीसग्रस्त वाढविण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta