बेळगाव : मागील महिन्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी बेळगावचा के.एल.ई हॉस्पिटलला धावती भेट दिली.
या वेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस व माजी महापौर श्री. मालोजीराव अष्टेकर व खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांच्यासोबत हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या अडचणी जाणून घेऊन विचारपूस केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धा ताडे या रुग्णाविषयी मेसेज मिळाला व तो मेसेज त्यांनी त्वरित आम्हास पाठवला. आम्ही योगायोगाने के.एल.ई. हॉस्पिटल येथे मंगेश चिवटे यांच्याबरोबर असल्यामुळे व तो मेसेज मंगेश यांना दाखवण्यात आला. त्यांनी त्वरित त्या मेसेजची दखल घेऊन रुग्णाची माहिती घेतली. मंगेश सरांनी लगेच रुग्णाची चौकशी केले व त्या रुग्णाच्या नातेवाईकांना बोलून घेऊन के.एल.ई हॉस्पिटलचे पीआरओ शंकर यांच्याशी त्या रुग्णाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर श्रद्धा ताडे यांचा अर्ज करून घेऊन एक विशेष पातळीवरती तो अर्ज मंजूर करण्यासाठी सांगितले. जवळपास अंदाजे 40,000 रुपये शस्त्रक्रियेसाठी खर्च होता. त्यांचा अर्ज स्वीकारून काही थोड्या कालावधीत तो अर्ज मंजूर करण्यात आला . त्याच मंजुरीचा युटीआर पत्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींना पाठवण्यात आला. ते पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचण्यासाठी सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी समितीचे नेतेमंडळी श्री. मालोजी अष्टेकर व श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या हस्ते त्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले व पुन्हा एकदा त्या रुग्णाची चौकशी केले. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क विकास कलघडगी व वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर, प्रशांत भातकांडे, अनंत पाटील हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta