बेळगाव (वार्ता) : पोलीस दलात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे नुकतीच आयुर्वेदिक औषधे सुपूर्द केली.
कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेवेळी येथील प्रोजेन रिसर्च लॅबचे डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिसांसाठी मोफत औषध पुरवली होती. समाज आणि जनहितार्थ काम करणार्यांच्या आरोग्यरक्षणासाठी डॉ. पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला होता.
यंदाही त्यांनी आपला हा उपक्रम सुरूच ठेवला असून गेल्या शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधे सुपूर्द केली.
याप्रसंगी गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी उपस्थित होते. कोरोना बाधित झालेल्या पोलिसांच्या आरोग्यरक्षणासाठी औषध पुरवणार्या डॉ. श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढून पोलीस आयुक्तांनी त्यांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta