बेळगाव : कंग्राळ गल्लीतील श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व पंच श्री. शंकरराव बडवानाचे यांच्या अध्यक्षतेखाली भरून या बैठकीत सन 2024-25 या वर्षाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस गल्लीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर गतवर्षीच्या जमाखर्चाला मंजुरी अनंतराव पाटील देण्यात आली. बैठकीत पंचमंडळातील श्री. मालोजी अष्टेकर, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुट्रे, परशराम दरवंदर, रमेश मोरे, अनंतराव पाटील इत्यादी उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सवाच्या संदर्भात चर्चा करण्यात येऊन गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे ठरले. चर्चेत गल्लीतील श्री. बाबू इंगोले, उत्तम सांबरेकर, शरद पाटील, प्रकाश पाटील व अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग दाखविला.
कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे
अध्यक्ष सुहास चौगुले, उपाध्यक्ष सिद्धार्थ होसुरकर, सेक्रेटरी रोहन निळकंठाचे, पंकज पाटील, ओंकार कंग्राळकर, विलास कंग्राळकर, उपसेक्रेटरी जोतिबा पाटील, हेमंत शंभूचे, खजिनदार बाबुराव इंगोले, सुरज काकतकर, उपखजिनदार प्रथमेश दरवंदर, विनायक सांंबरेकर, हिशोब तपासणी अभिषेक करेगार, प्रतीक पाटील, अक्षय पाटील, यश सांबरेकर, विनायक निळकंठाचे, विलास सांबरेकर, कार्याध्यक्ष राहुल निळकंठाचे, रोहित सांबरेकर, गजानन सांबरेकर, व्यवस्थापक सौरभ पाटील, निखिल बाळेकुंद्री, पवन बडवानाचे, निखिल पाटील, तुषार जाधव, संदीप बडवानाचे, मार्गदर्शक म्हणून पंच मंडळ व सल्लागार कार्यकर्ते करतील.