Wednesday , March 4 2026
Breaking News

स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे शानदार उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : तरुणांमध्ये प्रारंभापासून व्यायामाबरोबरच उत्तम, बळकट शरीराची आवड असली पाहिजे तसेच कोणत्याही व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे उद्गार पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बानियांग यांनी केळकरबाग येथील स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी काढले.
पुढे बोलतांना म्हणाले की, पावले परिवाराने व्यायाम शाळेची उभारणी केल्याने युवक- युवतीना याचा लाभ होईल. आज युवा पिढीत वार्धक्याचे प्रमाण वाढले आहे, त्यांनी व्यायामाचे लक्ष देण्याचे आवाहन केले.
प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. संचालक रमेश पावले व संभाजी पावले यांच्याहस्ते पाहुण्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व गदा भेट देऊन स्वागत केले. संभाजी पावले यांनी स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेची माहिती सांगितली.
स्ट्र्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बानियांग यांच्याहस्ते फीत सोडून व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मिस्टर एशिया सुनिल आपटेकर, विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते.
मिस्टर एशिया सुनिल आपटेकर यांनी आपणाला आलेल्या अनुभवातून आपण व्यायामकडे कसे लक्ष दिले तसेच युवकांना मार्गदर्शन करुन व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी विनायक पावले, विक्रम पावले, भूषण धामणेकर, विजय बोंगाळे, राजू मोरे, सुरेश धामणेकर, रमाकांत कोंडूसकर व चंद्रकांत कोंडूसकर, दत्ता जाधव, भरत पाटील, राजेंद्र हंडे, महेश कुगजी, माया पावले, आरती पावले, प्रतिभा पावले, पूनम पावले, भाग्यश्री धामणेकर आदी उपस्थित होते. शेवटी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *