बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी महावीर भवन, हिंदवाडी, बेळगाव येथे जितो बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मेघा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेगा रक्तदान शिबिरात बेळगावातील अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. डॉ. महादेव दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व रक्तदात्यांच्या सहकार्याने ७३८ युनिट रक्त संकलित करण्यात आले. यावेळी अध्यक्षा रोट. रुपाली बी. जनाज,
सचिव रोट. शीतल चिलामी, कार्यक्रमाचे अध्यक्षा रोट. डॉ. श्रीदेवी रेवण्णावर तसेच दर्पणच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta