बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांचा क्लबतर्फे 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे अविनाश पोतदार यांना शाल, श्रीफळ आणि गुलाबाचे रोपटे देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व सभासदांनी अविनाश पोतदार यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. यापुढेही अविनाश पोतदार यांनी कार्यरत राहून क्लबची भरभराट व क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करण्याचे कार्य करावे ही इच्छा प्रदर्शित करण्यात आली. प्रारंभी दीपक पवार, अजित गरगट्टी, प्रकाश मिरजी, संगम पाटील, बाळकृष्ण पाटील, अशोक नाईक, बबन देशपांडे, शरद पै, विजय पाटील, संजय सातेरी, सोमनाथ सोमनाचे राजू लेंगडे, विवेक पाटील, रवी केतकर, ऍड. धनराज गवळी, ओम प्रभू, समीर केशकामत, दयानंद हिरेमठ आदी सभासद उपस्थित होते.