Thursday , September 19 2024
Breaking News

बेळगावात गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेसतर्फे राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव या संस्थेच्यावतीने कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट ते रविवार दिनांक 1 सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेकरिता एकूण 1 लाख रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.
डिस्ट्रिक्ट सिलेक्टड प्लेयर्सकरिता प्रवेश शुल्क 600 रुपये, स्पेशल प्लेड डिस्ट्रिक्ट सिलेक्शनसाठी प्रवेश शुल्क 900 रुपये तर अन्य जिल्ह्यातील बुद्धीबळ पटूंसाठी 1500 रुपये प्रवेश शुल्क असून उशिरा नावनोंदणी करणाऱ्या खेळाडूंना प्रवेश शुल्कासह 300 रुपये अधिक आकारण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडू Chesscircle.com वर नावनोंदणी करू शकतात.
11 वर्षांखालील खुल्या गटातील तसेच मुलींच्या 11 वर्षांखालील वयोगटातील पहिल्या चार विजेत्यांना अनुक्रमे 12 हजार, 8 हजार, 6 हजार, 5 हजार, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकांच्या विजेत्यांना 3 हजार 500 रुपये, 3 हजार 500 रुपये तर सातव्या ते पंधराव्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 2500, 2000, 1500, 1500, 1000, 1000, 1000, 1000, 1000 रुपये बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
याशिवाय दोन्ही विभागातील 9 वर्षांखालील आणि 7 वर्षांखालील वयोगटातील 10 उत्कृष्ट बुद्धीबळपटूंना चषक ( ट्रॉफी) देऊन गौरविण्यात येणार आहे.
कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुला गट आणि कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगट अशा दोन्ही गटातील दोघा (टॉप 2) बुद्धीबळ पटूंना राष्ट्रस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.
स्पर्धेसाठी मुख्य अर्बीटर म्हणून प्रमोदराज मोरी (आयए), उप मुख्य अर्बीटर म्हणून प्रणेश यादव के (आयए) तर अर्बीटर म्हणून आकाश मडीवाळर (एसएनए) व सक्षम जाधव (एसएनए) काम पाहणार आहेत.
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी गिरीश बाचीकर 8050160834, आकाश मडीवाळर 8310259025 अथवा सक्षम जाधव 7899425214 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *