Thursday , March 5 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस

Spread the love

 

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या सहकारी शिक्षिका जयश्री पाटील या उपस्थित होत्या. यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाचा संपूर्ण आढावा प्रमुख पाहुण्या जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. क्रीडा विभागातर्फे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पाडण्यात आला. शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, विद्यार्थी, शिक्षक वर्ग उपस्थित होते. क्रीडा मंत्री इयत्ता नववीची विद्यार्थिनी स्नेहा हिरोजी हिने सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *