बेळगाव : कांही दिवसांपूर्वी कित्तूर नगर पंचायतीच्या भाजप सदस्याचे अपहरण झाले होते. पोलिसांनी शोध घेत अखेर त्या भाजप सदस्याचा शोध घेतला.
अपहरण झालेले भाजप सदस्य नागराज असुंडी पोलिसांना सापडले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयात त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चन्नम्मा कित्तूर नगरपंचायतीचे भाजप सदस्य नागराज असुंडी हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. नागराजच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सदस्याचे अपहरण केल्याचा आरोप भाजपने केला होता. आता नागराज असुंडी पोलिसांना सापडले असून अधिक माहिती मिळणे बाकी आहे. माजी आमदार दोड्डगौडर यांच्याशी नागराज असुंडी यांचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta