बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, समाजाबद्दल असलेल्या जाणिवेतून निर्माण झालेल्या या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे”असे उद्गार प्रख्यात मराठी अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना काढले.
येथील सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटीला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली आणि सोसायटीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. त्याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल शिरोडकर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व स्मतिचिन्ह देऊन सन्मान केला.
यावेळी व्हा.चेअरमन विजय सांबरेकर, संचालक माणिक सांबरेकर, दीपक शिरोडकर, प्रकाश वेर्णेकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर, सेक्रेटरी अभय हळदणकर व कर्मचारी उपस्थित होते.