बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कास्यपदक मिळविलेले आहे.
प्रथम क्रमांक : वेदांत मासेकर (73 किलो वजन गट), अंजली शिंदे (40 किलो वजन गट), रोहन नायकोजी (45 किलो वजन गट)
द्वितीय क्रमांक : श्रावणी पाटील (44 किलो वजन गट), वैष्णवी बैलूरकर (48 किलो वजन गट), यश सावंत (60 किलो वजन गट)
तृतीय क्रमांक : समर्थ शर्मा (40 किलो वजन गट), अक्षरा पाटील (36 किलो वजन गट), वेदांत माळवी (36 किलो वजन गट)
वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ शाळेचे क्रीडा शिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. आता प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तिन्ही विद्यार्थ्यांची निवड बेंगलोर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta