खानापूर : विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी (ता. ९) रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे.
बैठकीमध्ये चर्चा करून खानापूर तालुक्याच्या विविध समस्यांबाबत तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदींनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta