Sunday , July 26 2026
Breaking News

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला बस धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Spread the love

 

 

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे एका परिवहन बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला बस धडकल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुनील बंडरगर (वय 10) नामक मुलगा शिकवणी संपवून घरी जात असताना लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी सरकारी बसची धडक त्या विद्यार्थ्याला लागली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आणखी जण गंभीर जखमी झाला. अपघाताचे भीषण दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

चालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. बस चालकाच्या बेजबाबदारपणे गाडीची धडक विद्यार्थ्यांना लागली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *