Thursday , March 5 2026
Breaking News

कावळेवाडीच्या प्रेम बुरुडची मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रात निवड

Spread the love

 

कावळेवाडी : येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याची मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रात खास खेळाडूंसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्रात विलिंग्डन येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
मद्रास रेजिमेंट हे लष्करी क्रीडा केंद्र, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध खेळात देशातील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी या हेतूने हे राष्ट्रीय स्तरावरील मद्रास रेजिमेंट वेलिंग्टन कार्यरत आहे. देशातील निवडक जिद्द चिकाटी असलेल्या खेळाडूंची निवड केली जाते. अशा उच्च पातळीवरील क्रीडा केंद्रात प्रेम बुरुडला आपलं मैदानी खेळात भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संधी मिळाली आहे
प्रेम हा वयाच्या सहाव्या वर्षापासून धावण्याचा सराव करत आहे. त्याचे वय अवघे तेरा वर्षे आहे.गेल्या सातवर्षात त्याने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धेत पन्नास वेळा प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पंचवीस वेळा दुसरा क्रमांक प्राप्त करून आपला खिलाडूपणा सिद्ध केला आहे.
माध्यमिक विद्यालय कर्ले प्रशालेत इयत्ता आठवी वर्गात शिकत असताना, त्याला राष्ट्रीय स्तरावर लष्करी क्रीडा केंद्रांत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. ही त्याच्या आईवडिलांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावती आहे.
वडील यल्लापा बुरुड यांनी अथक परिश्रम घेऊन गरीब परिस्थितीमध्ये प्रेमला गरुड भरारी घ्यायला लावली. अतिदुर्गम ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
प्रेमला शिकवणारे एल. जी. कोलेकर, योग्य मार्गदर्शन करणारे काका राजू बुरुड, वेळोवेळी आर्थिक सहकार्य करणारे वाय. पी. नाईक, विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटून खेळाचे साहित्य देऊन प्रेरणा देणारे संतोष दरेकर, त्याच्या आईवडिलांनी घेतलेली मेहनत, गावातील लोकांचा, गुरूजनांचा आशीर्वाद, शुभेच्छा महत्त्वाचा आहे असे प्रेम बुरुडने भावना व्यक्त केल्या.
येत्या २४ सप्टेंबर रोजी पासून तो मद्रास रेजिमेंटमध्ये कार्यरत राहणार आहे. २२ सप्टेंबर रोजी बेळगावहून रवाना होणार आहे
त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *