बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त ‘गणेश वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ता. 15 रोजी शहर परिसरातील विविध 29 सार्वजनिक श्री मंटपासमोर घोषवादक (वादन) गणेश वंदन कार्यक्रमाद्वारे श्रीमूर्तीस वंदन करणार आहेत. संध्याकाळी 6 पासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे
दोन पथकाद्वारे हा कार्यक्रम होणार आहे. पहिले पथक शहापूर येथून तर दुसरे पथक श्रीनगर येथून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत.
पहिल्या पथकाची सुरुवात कचेरी गल्ली शहापूर येथून होणार आहे. तेथून गणेशपूर गल्ली शहापूर, बाजार गल्ली खासबाग, रयत गल्ली वडगाव, बाजार गल्ली वडगाव, नाझर कॅम्प वडगाव, नाथ पै नगर अनगोळ, धर्मवीर संभाजी चौक अनगोळ, राणी चन्नम्मा नगर, नानावाडी टिळकवाडी, कॅम्प (पोलीस स्टेशन समोर).
दुसऱ्या पथकाची सुरुवात श्रीनगर येथून होणार असून रामनगर (गॅंगवाडी), सुभाष नगर, वैभव नगर, मार्कंडेय नगर, (ज्योती नगर क्रॉस), टी. व्ही. सेंटर मुख्य रस्ता, हनुमान नगर (श्रीराम कॉलनी तिसरा क्रॉस), पांगुळ गल्ली, माळी गल्ली.
संयुक्त महाराष्ट्र चौक येथे दोन्ही पथके एकत्रित येऊन वादन करणार आहेत. तेथून बापट गल्ली, कांदा मार्केट, अशोक चौक, शिवाजी रोड (रेडिओ कॉम्प्लेक्स समोर), किल्ला रोड (देशपांडे पेट्रोल पंप समोर), फुलबाग गल्ली, एसपीएम रोड येथील (रेणुका हॉटेल समोर) श्रीमुर्ती समोर वादनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.