बेळगाव : सार्वजनिक पदवी पूर्व शिक्षण विभाग बेळगाव व ज्योती कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांघिक स्पर्धेमध्ये ज्योती कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. या स्पर्धा ज्योती कॉलेजच्या क्रीडांगणावर घेण्यात आल्या.
या तालुकास्तरीय स्पर्धेत ज्योती कॉलेजच्या कबड्डी मुलांच्या संघाने अंतिम स्पर्धेत मराठा मंडळ पियू कॉलेज किनये यांच्यावर एकतर्फी मात करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर मुलींच्या कबड्डी संघाने अंतिम फेरीत आरपीडी कॉलेजवर मात करून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तसेच खो-खो क्रीडा प्रकारात मुलांच्या व मुलींच्या संघाने अंतिम फेरीत मराठा मंडळ पियू कॉलेज बेळगाव यांच्यावर एकतर्फी विजय प्राप्त केला.
या स्पर्धेत कबड्डी व खो-खो स्पर्धेमध्ये आमच्या कॉलेजच्या मुलामुलींच्या संघाने नेत्रदीपक यश प्राप्त केले. या स्पर्धेत कबड्डी मुलांच्या संघात शुभम गुरव, प्रथमेश पाटील, गौतम देवळी, शुभम मादर, प्रसाद साळुंखे, आदित्य गुरव व इतर तसेच
मुलींच्या संघात सुष्मिता नाईक, सुष्मिता पाटील, जानवी पाटील, प्रेमावती कटंबळे, प्राजक्ता पाटील, तनुश्री पाटील, श्रावणी जाधव व इतर खेळाडू तर मुलांच्या खो-खो संघात दक्ष पाटील, कमलेश फडके, कुणाल चौगुले, श्रीनाथ कलखामकर, गणेश कोवाडकर, कलमेश पाटील तर मुलींच्या संघात संध्या पाटील, दामिनी पाटील, श्रेया कलखामकर, वसुधा नवगेकर, अपूर्वा चौगुले, संध्या बर्डे, गौतमीत चापगावकर इत्यादींनी खेळाडू स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
यावरील सर्व खेळाडूंचे कॉलेजचे प्राचार्य व स्टाफ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
या वरील सर्व खेळाडूंना कॉलेजचे प्राचार्य एस. एस. पाटील व स्टाफ यांचे प्रोत्साहन लाभत असून क्रीडा प्राध्यापक डॉक्टर आरडी हदगल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Check Also
मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश
Spread the love बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय …